Nag Panchami Information In Marathi – आपल्या भारतात अनेक सण आपण दरवर्षी साजरा करत असतो, त्यापैकीच एक म्हणजेच नागपंचमी हा सण आहे. खर तर हिंदू धर्माच्या दिनदर्शिकेनुसार नागपंचमी हा उत्सव सावन महिन्याच्या शुल्क पक्षात येत असतो. या दिवशी भगवान शिवचा नागदेवता याचे पूजन आपण दुधाने स्नान करून करत असतो.
पण काही ठिकाणी सापांना भोजन देण्याची परंपरा चालत आली आहे. पण सापाला भोजन दिल्यावर त्यांना पचन नाही होत त्यामुळे त्यांची मृत्यू सुद्धा होऊ शकते. आपण लहानपानापासून असे ऐकत आलो आहोत कि सापाला नागपंचमीच्या दिवशी दुध चढवले जाते. परंतु हे खोटे आहे कि साप हा दुध पेट नाही कारण शास्रात असे सांगितले आहे कि सापाला दुध पिण्यास सांगितले नाही तर त्यांना दुधाने स्नान करण्यात सांगितले आहे.
नागपंचमी हा दिवस फक्त नाग देवताची पूजाच नव्हे तर त्या दिवशी बऱ्याच गावात कुस्ती आयोजित केली जाते. आणि तसेच या दिवशी या गावातील लोक हे गायी, बैल इत्यादी प्राण्यांना नदी तलावामध्ये नेऊन स्नान केले जाते. तर चला मित्रांनो आता आपण जाणून घेऊ कि नागपंचमीची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्हाला खालील लेख संपूर्ण वाचवा लागेल.
नागपंचमीचे महत्व काय आहे – Nag Panchami Information In Marathi
अनुक्रमणिका
- 1 नागपंचमीचे महत्व काय आहे – Nag Panchami Information In Marathi
- 1.1 नागपंचमी २०२१ मध्ये कधी आहे? (When is Nagpanchami in 2021)
- 1.2 नागपंचमीचे महत्व काय आहे? (What is the significance of Nagpanchami)
- 1.3 नागपंचमी का साजरी केली जाते? (Why is Nagpanchami celebrated)
- 1.4 नागपंचमीची पूजा कशी करावी? (How to worship Nagpanchami)
- 1.5 नागपंचमीची विधी काय आहे? (What is the ritual of Nagpanchami)
- 1.6 नागपंचमी साजरी करण्यामागील कथा (The story behind celebrating Nagpanchami)
- 1.7 नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजे –
- 1.8 साप रत्न बद्दल माहिती (Information about snake gems)
नागपंचमी २०२१ मध्ये कधी आहे? (When is Nagpanchami in 2021)
नागपंचमी हा सण २०२१ मध्ये म्हणजेच या वर्षी आपणास १३ ऑगस्ट २०२१ या रोजी बुधवारी करण्यात येईल. या दिवशी सूर्योदय ०६.१८ ला सुरु होईल आणि सूर्यास्त १९.०७ ला होईल.
तिथी : | शु. पंचमी १३.४२ |
नक्षत्र : | हस्त ०७.५९ |
योग : | साध्य १३.४५ |
करण : | कौलव २४.४८ |
राष्ट्रीय : | २२ |
नागपंचमीचे महत्व काय आहे? (What is the significance of Nagpanchami)
आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक जनावरांची पूजा केली जाते, त्यात म्हणजे गाय झाली. त्यापैकीच एक म्हणजे नागदेवता हा एक आहे. फार्नाधारी सर्प म्हणजेच नागदेवता होय. या सापाच्या पुडाच्या बाजूला म्हणजेच फणेवर दहा अंकासारखे चिन्ह असतात. हिरवट आणि पिवळा असा याचा रंग असतो. त्याच्या तोंडात दोन दात असतात, आणि त्या दातात विष असते. त्यामुळे आपल्या प्राचीन संस्कृती पासून लोकांनि त्याला एक देवाचे स्थान देऊन त्याची पूजा करत आले आहे.
नागपंचमी हा सण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येत असतो. (Nag Panchami information in marathi) तसेच श्रावण महिन्यातील शुल्क पक्षाच्या पंचमीला नागदेवताची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवातला पाहणे शुभ मानले जाते.
नागपंचमी का साजरी केली जाते? (Why is Nagpanchami celebrated)
आता आपण जाणून घेऊ कि नागपंचमी का साजरी केली जाते, असे म्हटले जाते कि या दिवशी एक शेतकरी आपल्या शेतात नांगरत होता, आणि त्याच्या नांगरात एक नागिणीचे तीन पिल्ल हे मृत्यू मुखी झाले. मग त्यांना नंतर त्या नागिणीचा राग ओढवला गेला. म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. आणि त्याच प्रमाणे कोणीही खोदणी करत नाही, फळे-भाज्या कपात नाही, कोणत्याही पक्षाला मारत नाही असे काही नियम प्राचीन काळापासून चालत आली आहे. भक्त या दिवशी नागदेवाची पूजा करतात, त्यांना दुध व गहू अर्पण करतात आणि त्याच्या संरक्षणाची प्राथना करतात.
भारतात अशी रूढ आहे कि विवाहित बहिनीला आपला भाऊ आपल्या माहेरी घेऊन येतो. तरुण मुली आणि स्रिया झाडाला झोका बांधून गाणे म्हणतात. नागपंचमीच्या पहिल्या दिवशी मेहंदी काढली जाते, आणि मग सर्व स्रिया पूजाला जातात.
पूर्वी नागपंचमीच्या आठ ते दहा दिवस आधी गावातील सर्व स्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायची. मग या दिवसात झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ खेळायच्या. मग खेळता खेळता उखाणे, आणि म्हणायचे.
नागपंचमीची पूजा कशी करावी? (How to worship Nagpanchami)
हिंदू धर्मातील नागपंचमी हा सण खूप महत्वाचा असतो. या दिवशी महिला घर स्वच्छ करतात. आणि आपल्या घरात तसेच बाहेर अंगणात शेन सारवतात. आणि त्यावर खूप सुंदर रांगोळी काढतात. काही भागामध्ये नागाच्या वारूला पाशी महिला गाणी म्हणतात आणि त्या वारुळाची पूजा करतात. तसेच भारतात काही असे हि ठिकाण आहे कि नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करतात. (Nag Panchami information in marathi) कच्चे दुध आणि माणसाच्या आवडीच्या गोष्टी सर्पांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न हे नाही लक्षात ठेवले पाहिजे.
नागपंचमीची विधी काय आहे? (What is the ritual of Nagpanchami)
- सर्वात पहिले सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणे.
- मग आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घालणे.
- काही ठिकाणी पूजेसाठी ताजे अन्न जसे कि शेवल्या किंवा तांदूळ इ. केले जाते. त्याच प्रमाणे काही भागात एक दिवस आधी अन्न तयार केले जाते आणि नागपंचमीच्या दिवशी शिळे अन्न खाल्ले जाते.
- आदिवासी भागामध्ये जेरूळ पोताकर पूजनाची जागा भिंतीवर बनवली जाते. मग भिंतीवर चुन्याने भिंत थोडी पांढरी बनवली जाते. आणि त्यानंतर त्यावर बैल, मोर, आणि नागदेवता असे काही प्राणी काढले जातात.
- काही भागामध्ये पाच डोक असलेला नाग देवता याचे पूजन हे सोन, चांदी, लाकूड, हळद, चंदन,यांच्या शाईने किंवा घरच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेणानी केले जाते.
- सर्व प्रथम सापांच्या जवळ एक वाटी दुध चढवले जाते.
- नंतर कच्च दुध, पाणी, फुल, गंध, दुर्वा, आणि थोडे तांदूळ चाडवले जाते. आणि नंतर आरती कथा म्हटली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे.
नागपंचमी साजरी करण्यामागील कथा (The story behind celebrating Nagpanchami)
प्राचीन काळी एका पाटलाला सात मुले होती. सात हि मुलांचे लग्न झाले होते. धाकट्या मुलाची बायको हि सुजन आणि सभ्य होती, पण तिला एक हि भाऊ नव्हता.
एके दिवशी मोठ्या भावाची बायको म्हणजेच मोठी सून घर लीपण्यासाठी सर्व बायकांना एकत्र येण्यास सांगितले. सर्व दालीस आणि धुर्पी माती खोदण्यास सुरुवात केली. मग तिथे एक साप आला हे मोठ्या सुनेने पहिले आणि त्या सापाला मारू लागली. आणि मग हे पाहून धाकट्या सुनेने त्यांना रोखले, आणि म्हणाली कि – ‘त्याला मारू नकोस? हा एक निर्दोष प्राणी आहे हे एकून मोठी सुनने त्याला मारले नाही. मग साप एका बाजूला बसला. मग धाकटी सून त्या सापाला म्हणाली कि आम्ही घरी जाऊन परत येतो, येथून जाऊ नकोस. असे म्हणून ती सर्वा बरोबर माती घेऊन घरी गेली आणि मग तिथल्या कामात आडकून तिने दिलेले सापाला वाचन ती विसरून गेली.
जेव्हा दुसऱ्या दिवशी ती धाकटी सून सर्वासह तेथे पोहचली. आणि त्याच ठिकाणी तो साप बसलेला होता, त्याला पाहताच धाकटी सून म्हणाली – नमस्कार सर्प भाऊ मग साप म्हणाला कि – तो मला न्हाऊ म्हणाली म्हणून मी तुला सोडत आहे. कारण मला खोट बोललेलं आवडत नाही. मग ती म्हणाली – भाऊ मला क्षमा करा. मग साप म्हणाला – ठीक आहे आज पासून तू माझी बहिण आहे आणि मी तुझा भाऊ आहे. तुला काय हवे ते संग मी तुला देईल. ती म्हणाली – भाऊ मला काहीच नको तू माझा भाऊ होशील हीच खूप मोठी गोष्ट आहे.
मग असेच काही दिवस निघून गेले, नंतर तो साप तिच्या घरी एका माणसाचा अवतार घेऊन आला. आणि म्हणाला कि “माझ्या बहिणीला पाठवा” प्रत्येक जन म्हणू लागला कि तिला कोणताही भाऊ नाही, मग सर्प म्हणाला कि मी दूरच्या नात्यातला भाऊ आहे. त्यानंतर त्या लोकांनी त्याला घरात घेतले. मग तो त्याच्या बहिणी कडे गेला आणि तिला म्हणाला कि घाबरू नको मी तो सर्प आहे. मग तो त्याच्या घरी तिला घेऊन गेला. (Nag Panchami information in marathi) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला जाऊ दिले. तेथील श्रीमंती पाहून ती चकित झाली.
मग त्या सापाने तिला खूप दागिने आणि रक्कम देऊन घरी पाठवले. आणि हे मोठ्या सुनेने पहिले. आणि मग तिला कासेच वाटू लागले आणि मग धाकट्या सुनेच्या पतीच्या कान भाराने तिने चालू केले. आणि ती म्हणाली कि लहान सून हि चरित्रहीन आहे. मग तिच्या पतीने त्या धाकट्या सुनेला घरातून बाहेर काढून दिले. मग धाकट्या सून ला तीच सर्प भाऊ आठवला. आणि मग त्याच वेळी तिच्या घरी तो सर्प आला आणि त्याने सर्वाना सांगितले कि कोणी माझ्या बहिणीवर आरोप केला तर मी चावेल कारण मी मोठा सर्प देवता आहे माझ्या कडे खूप मोठ्या शक्ती आहे. मग त्याने आपले असली रूप त्यांना दाखवले आणि आपल्या बहिणीवर लागलेला आरोप काढला.
अशा प्रकारे आपल्या बहिणीवर लागलेला आरो काढला आणि आपले कर्तव्य त्याने बजावले. तेव्हापासून सावानाच्या सुळक पंचमीला सापाची पूजा केली जाते. स्रिया सापाला आपला भाऊ म्हणून पूजा करतात. धन्य किंवा धान्याच्या पूर्तीसाठी सापाची पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजे –
- या दिवशी नागदेवाताचे दर्शन खूप आवश्यक आहे.
- नागदेवता यांच्या निवासस्थान याची पूजा केली पाहिजे.
- सुवाहिक फुले आणि चंदन नागदेवतेची पूजा करण्यात वापरले पाहिजे कारण सापांना सुगंध फुले खूप आवडतात.
- जर एखाद्याला साप चावला तर ॐ कुरुकुल्ये हुं फट् स्वाहा याचा जप केला तर तो विष दूर होतो.
- आपण पहिले असेल कि सापांपासून लोक स्वतःच्या स्वार्थसाठी त्यांना मारून उपयोग करतात, तर हे आपण हे थांबवले पाहिजे.
साप रत्न बद्दल माहिती (Information about snake gems)
आपण लहान पानापासून चित्रपटात पाहत आलो आहे कि सापांच्या डोक्यावर रत्न असतो, तर आता आपण सापाच्या रत्न बद्दल खरी माहिती पाहणार आहोत. खर तर काही दिव्य सापांच्या मेंदूत रत्न असतो. आणि तो रत्न खरच अमुल्य असतो. तसेच आपल्या मेंदूत आयुष्यातल्या खूप मोठ्या गोष्टी आपण साठवून ठेवतो. समाजातील मुकुमानिसारखा महापुरुशनी जागा आपल्या मनावर असवी.
साप बिया मध्ये राहतो आणि एखाद्या वेळेस एकांत राहतो. म्हणून तर मुमुक्शुनी मेळावे टाळले पाहिजे. या उदाहरणात सर्पाचे एक उदाहरण दिले आहे.
देवता आणि असुर यांनी केलेल्या समुद्र मंथनाचे एक साधन बनून वासुकी नागाने देवांच्या कार्यामध्ये दुष्टांना वाड्या बनण्याचा मार्ग खुला केला होता. जर एखादी वाईट व्यक्ती सुद्धा चांगल्या मार्गावर आली तर तो सुद्धा चांगल्या कार्यात आपला मोठा मोबदला देऊ शकेल.
जर दुर्जानासुद्धा भवद कार्यात सामील झाला, तर देव त्याला सुद्धा स्वीकारतात. (Nag Panchami information in marathi)याने आपल्या गळ्यात आणि विष्णूला विश्रांती घेण्याद्वारे समर्थित केले गेले आहे.
जेव्हा संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी पावसाने हादपार केलेला साप जेव्हा पाहुणे म्हणून आमचे घरी तेव्हापासून त्यांचे मानण्याचे आपले कर्तव्य होते. त्यामुळेच श्रावण महिन्यातच नाग पंचमीला सण ठेवूब आपल्या ऋषींनी बरेच औचित्य दाखवले जाते.
हे पण वाचा
- वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती
- मुलेठी म्हणजे काय?
- भोपळा म्हणजे काय?
- गिलोय म्हणजे काय?
- बडीशेप म्हणजे काय?
- एव्होकॅडो काय आहे ?
आज आपण काय पाहिले?
तर मित्रांनो, वरील लेखात आपण Nag Panchami information in marathi पाहिली. यात आपण नागपंचमी खेळ म्हणजे काय? आणि त्यामागील कथे बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला नागपंचमी बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.
आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.
तसेच Nag Panchami In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Nag Panchami बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली नागपंचमीची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.
तर मित्रांनो, वरील नागपंचमीची माहिती या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.