7/12 utara in marathi online आजच्या काळात 7/12 चा उतारा काय असतो बहुतेक कमी लोकांना माहित असते. कारण लोकांना वाटत कि हे खूप अवघड काम आहे. परंतु याच्याबद्दल माहिती असणे फार आवश्यक आहे, तर मित्रांनो आपण जाणून घेऊ कि नेमका सातबारा काय म्हणजे काय? आणि आणि सातबारा चा उतारा समजून घेऊ. या लेखात तुम्हला विषयी डीप मध्ये सांगितले आहे. आणि त्यासाबोत काही फोटो पाहण्यास मिळतील तर मित्रांनो त्यासाठी खालील लेख वाचवा लागेल.

7/12 ची संपूर्ण माहिती 7/12 utara in marathi online
अनुक्रमणिका
सातबारा उतारा म्हणजे काय? (What is Satbara Utara?)
गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकतर करून त्यातील माहिती साताबार्याचा रुपात दिली जाते. सबब साताबारा उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो. त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते.
सातबारा म्हणजे हक्के नोंद व पिक पाहणी पत्रक. जमीन आणि महसुलाच्या व्यास्थापानासाठी प्रत्येक तालाठ्याजवळ जे वेगवेगळे गाव नमुने ठेवावे लागतात, त्यापैकी सातबारा हे दोन नमुने आहेत. सात व बारा हे मुख्य दोन गाव नमुने एकाच पानावर असतात म्हणून त्याला सातबारा उतारा असे म्हणतात.
सातबारा उतारा ऑनलाइन
गाव नमुना नंबर सात – हक्क अधिकार पत्रक
गाव नमुना 7 हे हक्क अधिकार पत्रक आहे तर गाव नमुना बारा हे पिक पाहणी पत्रक आहे. पूर्वीच्या काळी जमिनी कासानार्याचे नाव असा एक रकाना होता. त्याला 7 अ असे म्हणायचे आता तो शासनाने कडून टाकला आहे. हा नमुना कुल वाहिवातीची माहिती द्यायचा.
प्रत्येक जमीन मालकास किंवा भूधाकास स्वताकडे असलेले जमीन किती आणि कोणती हे दाखवणारा सातबारा हा उतारा आहे. जमिनीची मलिकी, कब्जा वहिवाट व अन्य अधिकार हा उतारा दाखवतो. या उतार्याप्रमाणे जमिनीवरील भौगोवात्यास पोलीस व महसूल खात्याकडून सौरक्षण मिळते. (7/12 utara in marathi online) नेहमी उपयोगी पडणारा हा उतारा असल्याने प्रत्येक जमीन मालकासाठी हा अत्यंत महत्वाचा असतो.
गाव नमुना सात हे हक्क अधिकार पत्रक आहे. सर्वात वरती अहवाल दिनांक असतो. त्याखाली गावाचे, तालुक्याचे व जिल्हाचे नाव वर लिहिलेले असते.
उतार्याच्या डाव्या बाजूस जमिनीचा बुमापन क्रमांक / सर्वे क्रमांक / गट नंबर / हिस्सा नंबर दाखवलेला असतो. सरकारने प्रत्येक गावातील जामिनाचा अथवा जमिनीच्या गटाला एक विशिष्ट नंबर दिलेला असतो. त्यालाच भूमापन क्रमांक / सर्वे कार्मांक / गट नंबर असे म्हणतात. तसेच ज्या न्हुमापन क्रमांकातील सडतील जामिनाचा हिसा कितवा आहे हे नंबर मध्ये दाखवले असते.
त्याच्या जवळच जमीन ज्या ज्या प्रकाराने धारण केलेली आहे तो धारणा प्रकार किंवा भूधार्ण पद्धती दाखलेली असते. सदरची जमीन संबंदित व्यक्ती कडे कशी आली त्यालाच धारणा किंवा भूधारक पद्धती असे म्हणतात.
यामध्ये ३ वर्ग असतात.
भोगावातदार वर्ग – 1 खालसा यालाच भूगोवठा वर्ग असे म्हणतात.याचा अर्थ जमिनापुर्वापर वंश परंपरेने चालत असलेली आहे. मालकी हक्क असलेली स्वत ची जमीन आहे.
भोगवटादार वर्ग – २ सरकारने भूमिहीनांना किंवा अल्प भूधारकांना कसण्यासाठी दिलेली जमीन या प्रकरणात मोडतात.जिल्हा अधिकाराने परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, बदेपत्ता, गहन, दान, हस्तांतरण करता येते.
भोगवटादार वर्ग – ३ सरकारने भाडे पट्ट्याने व विशिष्ट शर्ती आटी व विशिष्य कामासाठी व विशिष्ट मुदती साठी दिलेली भूधाराना पद्धती तीन मध्ये मोडते. ज्या सरती अटीवर जमीन असेल त्या शर्ती अटीच भंग झाल्यास सरकार अशा जमिनी परत कडून घेते.या इनाम किंवा वतन वर्गातील जमिनी असतात.जयला दुमाला असे म्हणतात. दुमाला किंवा इनाम ए पश्चिम maharastra तीन आहे. वर्ग -1 सरंजाम इनाम, वर्ग -३ देवस्थान इनाम, वर्ग 7 – संकीर्ण.
विद्दर्भ व मराठवाड्यातील दुमाला जमिनीचे वर्ग 7 – संकीर्ण हा एकाच वर्ग अस्तितवात आहे संकीर्न्न या शब्दाचा अर्थे महसूल माफीच्या जमिनीशी अशा जमिनी महाविध्यालय हास्पिटल किंवा धार्मिक कर्म करणाऱ्या संस्थाना दिलेल्या असतात. मात्र दिलेल्या कारणाकरिता अशा जमिनीचा वापर केला गेला नाही तर अशा जमिनी सरकार परत घेते.
देवस्थान इनाम – वर्ग ३ या जमिनी वहिवाट दर व्यतिरिक्त कोणाच्या नवे होत नाही म्हणजेच या जमिनी हस्तांतरित नाहीत.
भूमापन क्रमांकाचे स्थानिक नाव – या रकान्यामध्ये आपल्या जमिनीला दिलेले नाव असेल तर तिथे दिसते. उदहरण म्हणजे आंब्याचे वावर किंवा हादलीचा माल अस उल्लेख असतो. (7/12 utara in marathi online) जमिनीचा बुमापन कार्मांक लक्षात राहिला नाही तर जमीन मालकाने दिलेले नाव शेतकरी आणि तलाठ्याच्या दृष्ठीने महत्वाचे ठरते.
त्याखाली कलमात जमिनीचे लागवडीचे क्षेत्र एकर / हेकातर व गुठे / आरमध्ये दाखवले असते. यात जिरायत बागायत भात्शेतीय क्षेत्र किती याची एकूण नोंद असते.
पोटखराब – लागवडीस पूर्णतः अयोग्य अशी जमीन आणि तिचे दाखवलेले असते त्यामध्ये दोन प्रकार आहेत.
वर्ग अ – शेतातील बांध / नाले / खंदक / खाणी याची नोंद असते. व वर्ग ब – रस्ते / कळावे / तलाव इत्यादीची नोड असते.
आकार – या सदरात जमिनीवर लावण्यात येणार कर रुपये – पैसे यामध्ये दिलेला असतो. हि कर आकारण्याची पद्धत 100 वर्ष पूर्वीची आहे. त्याच्यात अजून कोणताही बदल झालेला नाही. यात देवस्थान जमिनी असल्यास जुडी अथवा विशेष आकार पुढे रक्कम नोंदवतात. नदीचे धरणाचे किंवा कालव्याचे पाणी शेतकऱ्याच्या जमिनीला मिळत असल्यास पाण्याबाबतचा कर आकाराला जातो.
भोगावतादाराचे नाव – गाव नमुना सात याचा मध्यभागी जमिनीचा भोगवतादाराचे नाव / मालकाचे नाव काब्जेदाराचे नाव लिहिलेले असते. आपण ज्या व्यक्तीशी व्यवहार करीत आहोत त्या व्यक्तीचे नाव कान्साबाहेर लिहिलेले असते.जर या सदरात व्यक्तीचा नावाला कंस केला असेल तर हा व्यक्ती जमिनीचा मालक नाही असे समजावे. हि नोंद तपासून पाहणे आवश्यक आहे.
फेरफार क्रमांक : कब्जेदार सदरी जी नाव लिहिली असतात त्यांचा बाजूला काही वर्तुळात काही क्रमाक दिलेले असतात. हे क्रमांक फेरफार क्रमांक असतात. वर्तुळात लिहिलेल्या क्रम्न्काचे फेरफार तपासून पाहणे आवश्यक असते.फेराफारच्या उतार्याला हक्काचे पत्रक असे हि म्हणतात.
गावाचा नमुना नंबर ६ म्हणजेच फेराफाराचा उतारा एखाद्या जमिनीच्या बाबतीत ती जमीन सध्याचा मालका कडे कशी आली या बाबातीची नोंद फेरफार उतार्यात सापडते. फेरफाराच्या उतार्यात नोंदिनीचा क्रमांक दिलेला असतो. हा च नोंदीचा क्रमांक 7/12 च्या उतार्यात वर्तुळात लिहिलेला असतो. सब 7/12 च्या उतार्यात वर्तुळात लिहिलेला क्रमांकावरून फेरफार उतारा कडता येतो.
गाव नमुना 7 मध्ये केलेल्या नोंदी बरोबर आहेत. असे गृहीत धरायचे असते. (7/12 utara in marathi online) जो पर्यंत या उतार्यात केलेली नोंद हि चुकीची आहे असे सिद्ध नाही तसेच चुकीच्या नोंदी एवजी दुसरी नोंद मजूर होत नाही तो पर्यंत जी आहे तीच नोंद खरी मानायची असते. काही वेळा जामिनाचा भोगवटादार खरा मालक नसतो तसे असतानाही दीर्घकालीन भोगवटादार मुळे ए जमिनीचा मालकी हक्क प्राप्त झालेला असतो.
गाव नमुना सात मध्ये नोंद करताना तलाठ्याने लिहिण्यात काही चूक केलेली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी जमीन महसूल संहीसा कलम १५५ नुसार तहसील दर यांच्या कडे दावा दाखल करावा. तहसीलदार सर्वे हितसंबंधीयांना नोटीसा कडून बोलावतात. सर्वांचे जाब जवाब नोंदून घेतात. सर्वाना म्हणणे मानण्याची संधी देऊन चुकीच्या लिखाणातील चूक दुरुस्त करण्याचा हुकुम देतात.
गाव नमुना सातच्या उजव्या वरती भूधाराचा जमिनीचा खाते क्रमांक व त्याखाली जमिनीवर कोणाची किलाहीवत असेल तर त्या किलाचे नाव नोंदवले असते. तसेच खंड पैशांचा स्वरुपात असेल तर खंडाची रक्कम दाखवलेली असते.
इतर अधिकार किंवा इअतर हक्क या सदरामध्ये जमिनीचा कब्जा नसलेल्या परंतु मालमत्ते मध्ये अधिकार बिजा धारक करणाऱ्या नवे लिहिलेली असतात. काही बोजे वाहक असल्यास ते कमी झाले अथवा नाही, जमिनीवर घेतलेले कर्ज फेडलेले आहे कि नाही, सहकारो सोसायटी बुविकास बँक सरकार तगाई वगरे नोंदी यांच्या मध्ये असतात. इतर हक्कात लिहिलेला शेरा निट समजावून घेणे फार गरजेचे आहे.
एकाद्या जमिनीच्या साताबारा मध्ये इतर हक्क या सदरात पुनावासानासाठी संपादित अस लिहिलेला असेल तर अशी जमीन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही. कुळकायदा कलम अस शेरा इतर हक्कामध्ये असेल तर जमीन संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही.
गाव नमुना १२ म्हणजे पिक पाहणी पत्रक (7/12 utara in marathi online)
वर्ष कोणते कोणत्या वर्षीची पिक पाहणी आहे स्वत जमीन शेतकरी कसतो कि मजुरांकडून करून घेतो. त्यांनी पिक कोणती घेतली आहे. त्याच्या जमिनीला पाणी विहिरी मार्फत आहेत. त्यांच्या जमिनीला पाणी विहिरी मार्फत आहे किंवा इरीगेशानामार्फात कि कनोल मार्फत आहे हे या नमुना बारा मधून आपल्याला दिसते.
7/12 digital
याचा मोठा उपयोग हा सख्या कि माहिती साठी महाराष्ट्राच्या शेती उत्पन्न कादाण्यासाठी, अवकाळी पावसामध्ये अवकाळी पावसामध्ये शेतीचे किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यासाठी आणि पिकाचे अंदाज बंदण्यासाठी होतो.या सगळ्या कामासाठी कृषी विभागाचा जो साख्याकी विभाग आहे ते या नमुना बाराचा वापर करतो. त्याच्या आधारे सगळी साखुअकी माहिती तयार होते. त्यावर जो शेवटचा रकाना आहे तो शेरा त्यावर अनेक शेतकर्यांना असे दिसेल कि एक विहीर आहे. दिन विहिरी आहेत. किंवा चिकूचे १० झाडे आहे. आंब्याचे ५ झाडे आहेत. अस प्रकारे फल झाडांच्या नोंदी आपल्या या नमुना बारावर दिसतील.
7/12 कसा शोधायचा ( 7/12 Utara online)
- सर्वात पहिले तुम्ही maharastra राज्य भूलेख यांच्या “bhulekh.mahabhumi.gov.in”वर जा.
- मग वेबसाईट वर गेल्या नंतर सर्वात पहिले तुम्हाला “नाशिक‘ ‘नागपूर‘ ‘औरंगाबाद’ ‘पुणे‘ ‘अमरावती‘ ‘कोकण‘ यासारखे विभाग तुम्हाला दिसतील आणि मग त्यात तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल.
- मग तुमच्या पुढे एक ‘ go’ नावाचे ऑप्शन येयील मग त्यावर क्लिक करा, मग तुमच्या स्क्रीन वर एक नवीन भाग येयील त्यावर असेल कि 7/12 किंवा 8 अ असा येणार मग तुम्हाला कोणतेही एक निवडावे लागेल.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाका आणि मग search वर click करा.
- आणि मग नंतर तुमचा mobile नंबर टाका आणि एक कॅपचा इनर तो भर आणि आणि मग ok वर click करा.
- मग तुम्हाल 7/12 वर स्क्रीन वर दिसेल.
हे पण वाचा
- Online पैसे कसे कमवायचे
- गुढीपाडवाची संपूर्ण माहिती
- कृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती
- रक्षाबंधनची संपूर्ण माहिती
- गणेश चतुर्थीची संपूर्ण माहिती
- दिवाळीची संपूर्ण माहिती
आज आपण काय पाहिले?
तर मित्रांनो, वरील लेखात आपण 7/12 utara in marathi online पाहिली. यात आपण सातबारा म्हणजे काय? आणि त्यांचे कसा पाहिचा? या बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला सातबारा बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.
आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.
तसेच 7/12 utara In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे 7/12 utara बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली सातबारा यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.
तर मित्रांनो, वरील सातबारा या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.
6A CHA 7/12 KASA ONLINE KADAYCH